गाडीवरील लाल दिव्याबाबत प्रश्नांची चौफेर सरबत्ती होत असतानाही महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिव्याचा आग्रह कायम ठेवला. माजी महापौर सुनील प्रभू यांनी त्यांची लाल दिव्याबाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांना कळवली होती. त्याचे उत्तर आले नसल्याने दिवा काढण्याचा प्रश्न येत नाही, असे महापौर आंबेकर म्हणाल्या. स्त्रियांची सुरक्षितता तसेच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याबाबत पुढाकार घेण्याचा इरादा व्यक्त करतानाच अनुसूचित जातीतील लोकांसाठी कार्यक्रमाची रुपरेषा अद्याप तयार केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
लाल दिव्याच्या आग्रहाबाबत सर्व थरांतून चर्चा होत असतानाही महापौरांनी याबाबत भूमिका कायम ठेवली. हा माझा वैयक्तिक निर्णय नसून महापौरपदाच्या मानाचा प्रश्न आहे, पक्षनेत्यांशी चर्चा केल्यावरच याबाबत भूमिका घेता येईल, असेही महापौर आंबेकर यांनी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-09-2014 at 04:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc mayor seeks red beacon car