उल्हासनगरमध्ये एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कॅम्प ३ भागातील मेमसाब नामक इमारतीचा स्लॅब कोसळल्याचे सुत्रांकडून कळते. पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
Maharashtra: 3 people died, 2 injured after a building collapsed Indira Gandhi Market, Ulhasnagar in Thane district earlier this afternoon. The injured have been shifted to a hospital. Teams of police and fire department are present at the spot.
— ANI (@ANI) February 3, 2019
उल्हासनगरमधील इंदिरा गांधी मार्केटमध्ये ही मेमसाब नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर साई आशिर्वाद नावाचे क्लिनिक आहे. या इमारतीचा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तो क्लिनिकमध्ये पडला. यामध्ये ३ महिलांचा जागीत मृत्यू झाला यामध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे. तर इतर तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना उल्हासनगरमधील सेंट्रल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नितू साजेदा (वय ६०), अनिता मौर्य (वय ३०), प्रिया मौर्य (वय ३) यांचा मृतात समावेश आहे. तर, हिराखेम चंदानी (वय ८०), वंदाना मौर्य (वय २४), खुशी मौर्य (वय २) हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.