मुंबई : राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक खासगी शाळेत जूनपासून सीसीटीव्ही बसविणे सक्तीचे करण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वर्षभरात लावण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. प्रत्येक शाळेत सखी सावित्री समित्या स्थापन केल्या जातील आणि त्या माध्यमातून मुलांना लैंगिक किंवा अन्य त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता व उपाययोजना केल्या जातील. पुण्यात २३ मार्च २०२२ रोजी शालेय विद्यार्थिनीबाबत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी सभागृहात निवेदन दिले. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिक्षण विभागाला निर्देश दिले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाच्या बैठका होऊन झालेल्या निर्णयांबाबत गायकवाड यांनी निवेदन केले. या समितीमध्ये शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन व दोन मुलगे व मुली यांचा समावेश राहील.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2022 रोजी प्रकाशित
प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही, सखी सावित्री समित्या; शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांची घोषणा
प्रत्येक शाळेत सखी सावित्री समित्या स्थापन केल्या जातील आणि त्या माध्यमातून मुलांना लैंगिक किंवा अन्य त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता व उपाययोजना केल्या जातील.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-03-2022 at 01:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv in every school sakhi savitri samiti education minister varshan gaikwad announcement akp