मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला १८ फेब्रुवारीला हजर करण्याचे आदेश मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. ठाणे येथील खंडणीच्या आरोपाप्रकरणी इक्बाल सध्या ठाणे कारागृहात बंदिस्त आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
इक्बालला ठाण्याहून मुंबईला आणण्यासाठीची पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) करावी, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. गुन्हेगारी जगत, बेकायदा मालमत्ता आणि हवाला व्यवहाराशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दाऊदची बहीण हसिना पारकर, इक्बाल आणि गुंड छोटा शकीलचा मेहुणा यांच्या मुंबईतील १० मालमत्तांवर ईडीने नुकतेच छापे टाकले होते. त्याच पार्श्वभूमीवर इक्बालची चौकशी करायची असल्याचे सांगत ईडीने त्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.
First published on: 17-02-2022 at 00:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court orders to produce iqbal kaskar akp