ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारण झाली असून, त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे सर्व अहवाल व्यवस्थित आहेत. त्यांना मंगळवारी रुग्णालयातून सोडण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.
दिलीपकुमार यांना शनिवारी पहाटे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९३ वर्षीय दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलेले नाही. सायरा बानू यांचे व्यवस्थापक मुर्शिद खान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, दिलीप कुमार यांची प्रकृती ठिक आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्याचे अहवालही व्यवस्थित आहेत. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip kumar likely to get discharged tomorrow