भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटबंदीनंतर चलनात आणलेली दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी २ हजारच्या नोटा बँकेत जमा करावेत, असे निर्देश दिले. यानंतर या निर्णयावर तर्कवितर्क लावले जात आहेत. सत्ताधारी भाजपाचे नेते यामुळे काळा पैसा संपेल, असं म्हणत आहेत, तर विरोधक हा फसलेला निर्णय म्हणत आहेत. अशातच आता अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी या निर्णयावर गंभीर आरोप केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्वास उटगी म्हणाले, “८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. वस्तुस्थितीत काळा पैसा बाहेर आला नाही. १७ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत जमा आल्या. हे प्रमाण ९९.३ टक्के आहे म्हणजे १०० टक्के नोटा पुन्हा परत रिझर्व्ह बँकेकडे आल्या.”

“नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही, उलट…”

“यावरून नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही, दहशतवाद थांबला नाही, उलट काळा पैसा वाढतच गेला. सध्या बाजारात ३२ लाख कोटी रुपयांच्या नोटा आहेत. यातील काळा पैसा किती आणि पांढरा पैसा किती, कुणी किती पैशावर कर भरला आणि किती पैशावर कर भरला नाही, हे अस्पष्ट आहे,” असं विश्वास उटगी यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : धक्कादायक !, स्विस बँकेत भारतीयांचे ७ हजार कोटी, ५० टक्क्यांनी झाली वाढ

“…तर तो काळा पैसा आहे असं म्हणावं लागेल”

“अजूनही सर्वसामान्यांकडे फिरणारा पैसा करचोरीचा असेल तर त्याचं गणित कोणी सांगावं. आत्ता २००० रुपयांची नोट बाहेर गेली तेव्हा ५०० च्या नोटा मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या. या मोठ्या प्रमाणात छापलेल्या नोटा करचोरी करणाऱ्यांच्या हातात असतील, तर तो काळा पैसा आहे असं म्हणावं लागेल. तो पैसा व्यवहारात असेल तर त्याला पांढरा पैसा म्हणावं लागेल,” असंही विश्वास उटगींनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic expert vishwas utagi comment on two thousand rupees note currency decision black money rno news pbs