ज्येष्ठ गझलकार व कवी मनोहर रणपीसे (६८) यांचे दीर्घ आजाराने मुंबईत बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून रणपीसे कर्करोगाने आजारी होते. ‘मृगजळाचे गाव माझे’, ‘शुभ्र कमळांचे तळे’, ‘सुफी’, ‘वाळुची घरे’, ‘प्रेषित’, ‘अद्वैत’, ‘बहरलेले झाड,‘अंतर्यामी’, ‘निर्वाण’, ‘कोरा कागद’ हे त्यांचे गझलसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘निसर्ग आणि मी’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. युआरएल फाऊंडेशनच्या ‘गझल गौरव’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. श्रोत्यांसमोर अत्यंत ताकदीने गझल पोहोचविणे हे रणपीसे यांच्या गझल सादरीकरणाचे वैशिष्ठय़ होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-09-2015 at 00:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghazal singer manohar ranpise passes away