खासगी क्लासमधून बेपत्ता असलेल्या एका विद्यार्थिनीचा कल्याण-मलंग रस्त्यावरील एका बारच्या मागील बाजुस गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरूवारी संध्याकाळपासून १९ वर्षांची ही तरूणी बेपत्ता होती.
रजनी राजकुमार वर्मा असे मृत तरूणीचे नाव आहे. ती नांदिवली येथे राहत होती. मुलगी बेपत्ता असल्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
एका अनोळखी तरूणीचा मृतदेह मान व गळा चिरलेल्या अवस्थेत पडला असल्याची माहिती कोळसेवाडी व मानपाडा पोलिसांना मिळाली होती. राजकुमार यांनी हा आपल्या मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना दिली. रजनी बाहेरून बारावीची परीक्षा देत होती. ती कल्याण पूर्वेत लोकग्राममध्ये खासगी क्लासला जात होती.
गुरूवारी संध्याकाळी क्लास सुटल्यानंतर मुलगी घरी आली नाही म्हणून वडिलांनी शोध घेतला पण ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिचे वडील कपडे शिवण्याचे काम करतात.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2014 रोजी प्रकाशित
कल्याणमध्ये विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या
खासगी क्लासमधून बेपत्ता असलेल्या एका विद्यार्थिनीचा कल्याण-मलंग रस्त्यावरील एका बारच्या मागील बाजुस गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
First published on: 22-02-2014 at 12:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl students chopped to death in kalyan