टाळेबंदीत ३,७०० श्रमिक गाडय़ा, ५३ लाख प्रवासी

मुंबई: करोना टाळेबंदीनंतर कामगार आणि मजूरांना कु टुंबियांसह आपआपल्या राज्यांत परतता यावे यासाठी रेल्वेने २८ मेपर्यंत कमी वेळेत ३,७०० श्रमिक गाडय़ा सोडण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या गाडय़ांमधून ५३ लाख प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली.

भारतीय रेल्वेचा पसारा आणि कार्यक्षमता मोठी असल्यानेच टाळेबंदीतही मोठय़ा संख्येने श्रमिक गाडय़ा चालवून कामगार आणि त्यांच्या कु टुंबियांची वाहतुक करण्यात आली. श्रमिक गाडय़ा सोडण्याची प्रक्रि या वेगळी आणि नियोजित असते. विशेष रेल्वे शेवटच्या स्थानकातून सुटल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा त्याच मार्गावर गाडय़ांची मागणी केल्यानंतरही श्रमिक गाडय़ा मागणीनुसार त्या राज्यासाठी पाठविल्या जातात. कमीत कमी वेळेत ही प्रक्रि या राबविली जाते. राज्य सरकार यातील के वळ १५ टक्केच खर्च उचलत असून ८५ टक्के खर्चाचा भार रेल्वे उचलते.

रेल्वेने २८ मे २०२०पर्यंत ३७०० श्रमिक गाडय़ा चालवताना ५३ लाखाहून अधिक प्रवाशांना त्यांच्या राज्यांत सोडले. यातील ८० टक्के रेल्वे गाडय़ा उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी सोडण्यात आल्या. श्रमिक गाडय़ांची मागणी २० आणि २१ मे ला अनेक राज्यांनी केली. त्यानंतर गाडय़ा उत्तर प्रदेश, इटारसी, जबलपूर, पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन मार्गावरून चालवण्यात आल्या. या मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता स्थानकावरून प्रवाशांना गाडय़ांमध्ये प्रवेश देण्याची सर्व प्रक्रि या पूर्ण करण्यात वेळ गेला आणि काही गाडय़ांना उशिर झाला. या प्रवासात आजारी प्रवाशांची काळजीही घेण्यात आली. ती घेताना काही वेळा गाडय़ाही थांबवाव्या लागल्या, असे रेल्वेने स्पष्ट केले.

टाळेबंदीआधी भारतीय रेल्वेकडून १३ हजाराहून अधिक पॅसेंजर गाडय़ा आणि ९ हजाराहून अधिक मालवाहतूक गाडय़ा सोडण्यात आल्या. रेल्वे प्रवासी गाडय़ांचा वक्तशीरपणा ९० टक्के पेक्षा जास्त राहिला आहे.

पश्चिम रेल्वेने उत्तर प्रदेश, बिहार आणि जळगाव-इटारसी-जबलपूर मार्गावरून गाडय़ा चालवल्या. या गाडय़ा कमी अंतराच्या होत्या. परंतु पश्चिम रेल्वेने २१ मे ला याच मार्गावरून २९ गाडय़ा चालविल्या. तांत्रिक अडथळ्यांमुळे गाडय़ांचा ताण वाढला. परंतु त्यांत खंड पडू म्हणून पश्चिम रेल्वेने नवीन योजनाही राबवल्या.

 ८४ लाख अन्नपाकिटांचे वाटप   

पश्चिम रेल्वेने मजुरांना श्रमिक गाडय़ांतून सोडण्यासाठी नवीन मार्गाचाही अवलंब के ला. मजूर-कामगारांची खाण्यापिण्याची अडचण होऊ नये यासाठी ८४ लाखांहून अधिक भोजनाची पाकिटे आणि सव्वा कोटींहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचेही वाटप के ल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

गाडय़ांचे मार्ग ठरल्यानुसारच 

श्रमिक रेल्वे गाडय़ा नियोजित मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गावरून चालवण्यात येत असल्याची चर्चा माध्यमे आणि समाजमाध्यमांवर झाली. या गाडय़ा आपला नियोजित मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावरुन चालवल्या, अशीही वृत्ते प्रसारित करण्यात आली. परंतु, गाडय़ा कधीही आपल्या मार्गावरुन भरटकत नाहीत

किं वा लोको पायलट गाडीचा मार्ग कधीही बदलू शकत नाही. रेल्वेचे मार्ग निश्चित असतात. हे मार्ग विभागीय मंडळ, नियंत्रक, यांच्याकडून निश्चित  के लेले असतात, असेही रेल्वेने स्पष्ट केले.