Premium

विविध क्षेत्रांतील संधींबाबत मार्गदर्शन, ‘लोकसत्ता मार्ग यशा’चा कार्यशाळेचे दुसरे पर्व २ आणि ३ जूनला ठाण्यात

सर्व प्रश्न व शंकांचे निरसन तज्ज्ञांकरवी करण्याचे व्यासपीठ यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

loksatta career
‘लोकसत्ता मार्ग यशा’चा

मुंबई : बदलता काळ, धोरणे, बाजारपेठेची गरज या अनुषंगाने कला, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा, डिजिटल माध्यमे आदी विविध क्षेत्रांतील संधींची ओळख करून देणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा २ व ३ जून रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. सर्व प्रश्न व शंकांचे निरसन तज्ज्ञांकरवी करण्याचे व्यासपीठ यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आजपासून प्रवेशिका मिळणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन नोंदणीही करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहावी, बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या अधिक संधी निर्माण झाल्या आहेत, कोणत्या क्षेत्रात अधिक वाव आहे यांसह विविध क्षेत्रे, नव्या संधींची सखोल माहिती, तणावाला सामोरे कसे जायचे, नव्या शिक्षण धोरणामुळे होणारे बदल आदी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर विविध शंकांचे निरसनही होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guidance opportunities second edition workshop of loksatta marg yasha on 2nd and 3rd june in thane ysh