सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मंगळवारी सकाळी हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पनवेल आणि खांदेश्वर या स्थानकांदरम्यानच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हार्बर रेल्वेमार्गावर ट्रेन्स उशीराने धावत आहेत. दरम्यान, वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागेल याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour railway running late due to signal problems in mumbai