‘लोकसत्ता’तर्फे नवरात्रोत्सवात राबविण्यात आलेल्या ‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमातील निवडक नवदुर्गाच्या सत्काराचा संगीतमय सोहळा येत्या मंगळवारी (ता. १७) नामवंतांच्या उपस्थितीत होणार असून त्यासाठी शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर, उद्योजिका अचला जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, राज्याच्या नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. शुभांगी पारकर आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
‘लोकसत्ता’तर्फे ‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमांतर्गत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या नऊ जणींची निवड करण्यात आली होती. प्रमिलाताई कोकड, शुभांगी बुवा, उषा मडावी, मीनाक्षी देशपांडे, निरुपमा देशपांडे, बेबीताई गायकवाड, डॉ. सुरेखा पाटील, मनाली कुलकर्णी आणि डॉ. अंकिता पाठक या त्या नऊ दुर्गा आहेत. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात संध्याकाळी ६ वाजता सुरू होणारा नवदुर्गाच्या सत्काराचा संगीतमय सोहळा सर्वासाठी खुला आहे. नवदुर्गाच्या या संगीतमय सत्कार सोहळ्यातील गायक कलाकार आहेत अमृता काळे, नचिकेत देसाई, अद्वैता लोणकर, तर नीला सोहनी, उमा देवराज, मुक्ता रास्ते, प्रेशिता मोरे, विनिता जाधव हे वादक आहेत. कार्यक्रमाची निर्मिती ‘मिती क्रिएशन्स’ यांची असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत. या संगीतमय सत्कार सोहळ्याच्या प्रवेशिका रवींद्र नाटय़ मंदिर येथे उपलब्ध आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2015 रोजी प्रकाशित
नामवंतांच्या उपस्थितीत नवदुर्गाचा सत्कार सोहळा
या संगीतमय सत्कार सोहळ्याच्या प्रवेशिका रवींद्र नाटय़ मंदिर येथे उपलब्ध आहेत.
Written by रत्नाकर पवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-11-2015 at 01:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honor to navdurga