राज्यात आम्हीच मोठा भाऊ असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. पण विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असून, जागा वाटपात भाजपानं फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्याला तिलांजली दिल्याचं दिसून आलं. शिवसेनेला केवळ १२४ जागाच देण्यात आल्या. जागावाटपापूर्वी आक्रमकपणे फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर जोर देणाऱ्या शिवसेनेनं मिळालेल्या जागा स्वीकारल्या. त्यावरून ही शिवसेनेची लाचारी की, रणनीती? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आला. शिवसेनेच्या बदलेल्या भूमिकांचा वेध घेणारी ही चर्चा…