तंत्रज्ञान व समाजपरिवर्तनाच्या योजनांचा अभिनव मिलाफ असलेल्या जळगावच्या ‘गुड्डा-गुड्डी’ डिजिटल फलकाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.
डिजिटल इंडिया सप्ताहादरम्यान ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या सामाजिक उपक्रमाचे महत्त्व पटवून देणारा ‘गुड्डा-गुड्डी’ फलक देशभरात झळकविण्यासाठी महिला व बाल कल्याणमंत्री मेनका गांधी यांनी पुढाकार घेत यासंबंधी पंतप्रधान कार्यालय तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयास पत्र लिहिले आहे.
औपचारिकता पूर्ण झाल्यावर हा फलक देशभर झळकेल.
जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अगरवाल यांच्या कल्पनेतून साकारल्या गेलेल्या या डिजिटल फलकाचे सादरीकरण मेनका गांधी यांच्यासमोर बुधवारी करण्यात आले. मुली वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन, चित्रे व ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून या भागात जागृती करण्यात येते, अशी माहिती अगरवाल यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaons gudda guddi in digital india