दहीहंडी संदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या अटी मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
उंची, वयाच्या मर्यादेमुळे दहीहंडी संयोजक नाराज
दहीहंडी उत्सवाच्या व्यावसायिकीकरणातून गोविंदा पथकांमध्ये थरावर थर रचण्यासाठी लागलेल्या चुरशीला सोमवारी उच्च न्यायालयाने लगाम घातला. तसेच १२ वर्षांऐवजी १८ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागासह २० फुटांवर थर रचण्यास न्यायालयाने बंदी घालत यासंदर्भातील परिपत्रक तातडीने काढावे व त्यास व्यापक प्रसिद्धी द्यावी असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे आव्हाड यांनी जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
झगमगाटाला आवर!
दुसरीकडे, आयोजकांनी बांधलेल्या दहीहंडीची उंची २० फुटांपेक्षा अधिक असली तरीही आम्ही ती फोडणार आणि त्यामुळे होणाऱया कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याचा निर्धार दहीहंडी समन्वय समितीने व्यक्त केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2014 रोजी प्रकाशित
दहीहंडी संदर्भातील अटींविरोधात जितेंद्र आव्हाड सर्वोच्च न्यायालयात
दहीहंडी संदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या अटी मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी याचिका दाखल केली आहे.

First published on: 13-08-2014 at 01:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad challenge bombay high court order in supreme court