कोकेन बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेले यश बिर्ला समूहाच्या उद्यम व्यवहार विभागाचे अध्यक्ष आनंद वर्धन यांच्यासह दोघांना विशेष न्यायालयाने शनिवारी अखेर सशर्त जामीन मंजूर केला. गेल्या आठवडय़ात वर्धन यांना अटक झाली होती. वर्धन यांच्यासह त्यांचा अंगरक्षक दिलीप पालेकर आणि शिपाई धरमू राठोड या दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने वर्धन यांना दीड लाख रुपयांच्या, तर पालेकर आणि राठोड यांना २५ हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. चौकशी बोलावण्यात आल्यावर तिघांनाही हजर राहण्याचे तसेच  परवानगीशिवाय परदेशी जाता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.