गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सुधार याचिका फेटाळल्यानंतर बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमन याने राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्ज बुधवारी फेटाळण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हा अर्ज फेटाळल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.
दयेचा अर्ज राज्यपालांकडे सादर केल्यावरच राज्य सरकारने तो फेटाळण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. मात्र, राज्यपालांनी त्यावर निर्णय दिला नव्हता. याकुब मेमनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काय निकाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सुधार याचिका आणि डेथ वॉरंटविरोधातील याकुब मेमनच्या याचिका फेटाळल्या. त्यानंतर लगेचच राज्यपालांकडून दयेचा अर्ज फेटाळण्यात आला. ऑसर्वोच्च न्यायालयाने याकुब मेमनच्या निर्णय सुधार याचिकेच्या निकालामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे स्पष्ट केले. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयीन प्रक्रियेचा योग्य पद्धतीने वापर केला गेल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2015 रोजी प्रकाशित
याकुब मेमनचा दयेचा अर्ज राज्यपालांनी फेटाळला
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सुधार याचिका फेटाळल्यानंतर बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमन याने राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्ज बुधवारी फेटाळण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-07-2015 at 04:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra governor rejects yakub memons mercy plea