मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, कृषी यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेच्या निकालाबाबत सीईटी कक्षाकडून वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षकडून पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे तत्कालीन आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर सीईटी कक्षाकडून निकालाची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली. त्यात एमएचटी सीईटीच्या (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) निकालाची संभाव्य तारीख १० जून अशी जाहीर करण्यात आली होती. परंतु सीईटी कक्षाने एमएचटी सीईटीचा निकाल हा १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करणार असल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीईटी कक्षाकडून तारखांवर तारखा जाहीर करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा…पवई भीमनगरमध्ये पोलिसांची दडपशाही? बेदम मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट; म्हणाले, “हा रुमाल बांधलेला माणूस…”

सीईटी कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीला ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम या गटातून तर पीसीबी या गटातून ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mht cet result dates creates uncertainty confusion in students mumbai print news psg