मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीमध्ये मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मालाडमधील विजय इंडस्ट्रियल इस्टेटमधील चावडा कमर्शियल बिल्डिंगमध्ये मंगळवारी संध्याकाळी उशीरा आग लागली. आगीचे स्वरुप भीषण असून आग वेगाने पसरत होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. आगीत जीवितहानी झाली नव्हती. आगीत आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असावे असे सांगितले जाते. आग लागलेली इमारत तीन मजली असून इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती. ही आग आता तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.
Visuals from Mumbai: Fire breaks out in Malad's Chawda Commercial Building, 8 fire tenders on the spot. pic.twitter.com/1cQOzFoTaZ
— ANI (@ANI) May 23, 2017