टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर ३१ जुलैला बलात्कार करणारा एक अल्पवयीन आरोपी गोटय़ा याने सफाईदारपणे पोलिसांना गुंगारा दिला होता. छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी याच गोटय़ाला पोलिसांनी संशयित म्हणून आणले होते. पण त्याने पोलिसांना ताकास तूर लागू न देता घर गाठले होते.
या प्रकरणात पोलिसांनी अनेक संशयितांची धरपकड केली होती. १७ वर्षांचा गोटय़ा हा त्यापैकीच एक. त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यांची नोंद होती. त्यापैकी ३ आग्रीपाडय़ात, १ ताडदेव आणि १ एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी २० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते. त्यापैकी एकाने गोटय़ाला पकडून आणले. छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात तो नव्हता. त्यामुळे त्याला सोडण्यात आले होत़े पण त्याने ३१ जुलै रोजी टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर बलात्कार केला होता. त्यामुळे ते प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याला पुन्हा पकडण्यात आल़े बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2013 रोजी प्रकाशित
अल्पवयीन गोटय़ाचा पोलिसांना चकवा
टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर ३१ जुलैला बलात्कार करणारा एक अल्पवयीन आरोपी गोटय़ा याने सफाईदारपणे पोलिसांना गुंगारा दिला होता.
First published on: 05-09-2013 at 01:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai gangrape minor rapist of telephone operator still abscond