महापालिकेच्या सुरक्षा रक्षक भरतीमध्ये काही उमेदवारांची शारीरिक चाचणी भलत्यांनीच दिल्याचे पुराव्यानिशी सिद्ध होऊनही तसेच या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आल्यानंतरही मुळातच असा काही घोटाळा झालेलाच नाही, असा अजब दावा प्रशासन आता करू लागले आहे. त्यामुळे या घोटाळ्याच्या चौकशीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेच्या सुरक्षा रक्षक भरतीमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारासाठी भलत्याच व्यक्तीने चाचणी दिल्याचे ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर राजकारण्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा तगादा लावला
होता.