अंबरनाथ येथील मोरीवली औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कंपनीत मंगळवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत कंपनीचे मालक सी. नारायण (६३) यांचा मृत्यू झाला, तर तीन कामगार किरकोळ जखमी झाले.
मोरीवली औद्योगिक वसाहतीत हनाका ही औषध निर्मीतीसाठी लागणारे रसायन तयार करणारी कंपनी आहे. येथे तीन पाळय़ांमध्ये २५ कामगार काम करतात. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेवणाची सुटी झाल्याने कामगार बाहेर गेले असताना ही दुर्घटना घडली. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या कंपन्यांच्या काचा फुटल्या. कंपनीत कामगार अडकल्याची भीती असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका, आयुध निर्माण कारखाना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उल्हासनगर तसेच कल्याण महापालिका प्रशासनाचे अग्निशमन दल घटनास्थळी असूनही तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आली. बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनावणे आग नियंत्रणात आणताना किरकोळ जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person die in boiler blast in ambernath