शासकीय दौऱ्यावरून वाद निर्माण झाल्यानेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपला अमेरिका दौरा अखेर रद्द केला. मुख्यमंत्री कार्यालयाने विखे-पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यात सहभागी होणार, असे प्रसिद्ध केले होते. एकीकडे काँग्रेसने भाजपच्या विरोधात आघाडी उघडली असताना विरोधी नेत्याने शासकीय खर्चाने अमेरिका दौरा करणे योग्य ठरणार नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसच्या वतीनेही शक्यतो दौरा टाळावा, असा सल्ला देण्यात आला. यामुळे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरिता अमेरिका दौरा विखे-पाटील यांनी रद्द केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2015 रोजी प्रकाशित
राधाकृष्ण विखे-पाटील यांची अमेरिकावारी रद्द
शासकीय दौऱ्यावरून वाद निर्माण झाल्यानेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपला अमेरिका दौरा अखेर रद्द केला.

First published on: 02-07-2015 at 04:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil cancels us tour