महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर सुनावणी सुरू आहे. याआधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलंही आहे. त्यामुळे सोमवारी (३० ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर रविवारी (२९ ऑक्टोबर) दिल्ली दौऱ्यावर आले. दिल्लीत दाखल होताच त्यांनी या दौऱ्याचं कारण सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल नार्वेकर म्हणाले, “दिल्लीत माझ्या काही भेटीगाठी आहेत. तसेच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याबरोबरही माझी बैठक होणार आहे. ती सर्व कामं करून मी पुन्हा मुंबईला जाणार आहे.”

“सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याबरोबर आजच बैठक”

“सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याबरोबर माझी आजच बैठक होईल. मी त्यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेणार आहे. त्यानुसार पुढे काय कार्यवाही करायची हे ठरवणार आहे,” अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.

“पूर्ण माहिती घेऊन मी निर्णय घेईन”

“सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे साहजिक तेथे युक्तिवाद तर होणारच आहे. आता आमच्या बाजूने नेमका काय युक्तिवाद करायचा आहे आणि एकूण कायदेशीर परिस्थितीची पूर्ण माहिती घेऊन या प्रकरणातील निर्णय मी घेईन,” असंही नार्वेकरांनी नमूद केलं.

हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “असं असेल तर…”

“आमदारांच्या अपात्रतेबाबत तुमच्या मनात काय?”

“आमदारांच्या अपात्रतेबाबत तुमच्या मनात काय?” या प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, “माझ्या मनात केवळ महाराष्ट्र राज्याच्या जनतेला न्याय देणं एवढंच आहे. लवकरात लवकर न्याय मिळेल.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul narwekar tell reason behind delhi visit before supreme court hearing pbs