मालवणी परिसरातील एका बंगल्यामध्ये सुरू असलेल्या डीजे पार्टीवर रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून २० जणांना ताब्यात घेतले. या सर्वाना दंड केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
या ठिकाणी रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून कारवाई करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात विनापरवाना पार्टी सुरू असल्याचे उपायुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या २० जणांमध्ये काही समलिंगी तरुणांचा समावेश होता. मालवणी पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नियमानुसार दंड भरून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid by police on unpermitted party