मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेंचा साखरपुडा उद्या म्हणजेच ११ डिसेंबरला घरच्या घरी होणार आहे अशी माहिती समोर येते आहे. अमित ठाकरेंचा साखरपुडा त्यांची मैत्रीण मिताली बोरुडेसोबत सोमवारी म्हणजेच ११ डिसेंबरला कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवास्थानी होणार आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातली बातमी दिली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर असल्याची माहिती समोर येते आहे. अमित ठाकरे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. अमित आणि मिताली या दोघांची जुनी ओळख आहे. या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि मग विवाहात होणार आहे. उद्या होणाऱ्या या घरगुती सोहळ्याला कोणाकोणाची हजेरी असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरेंच्या घरात अनेक दिवसांनी सनईचे सूर ऐकू येणार आहेत.
First published on: 10-12-2017 at 17:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackerays son amit thackeray to get engaged with mitali borude