लंडनहून महागडी घडय़ाळे, परफ्युम्स आदी सामान घेऊन मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या अभिनेता रणबीर कपूरला सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेऊन पन्नास हजारांचा दंड आकारला. या महागडय़ा सामानाचा तपशिल त्याने जाहीर केलेला नव्हता. या कारवाईने संतप्त झालेल्या रणबीरने ‘गेल्या तीस वर्षांत मला कुणी अडवले नाही’ अशा उर्मटपणे आपला राग व्यक्त केले.
अभिनेता रणबीर कपूर लंडनहून ब्रिटीश एअरवेजच्या फ्लाईटने शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. अधिकारी आणि विमानतळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पॅसेजमधून बाहेर पडत असतांना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला हटकले. रणबीरच्या सामानाची तपासणी केली असता त्यात परफ्र्युम्स, महागडी घडय़ाळे ऐवज सापडला. त्याचा तपशिल त्याने जाहीर केलेला नव्हता. त्यामुळे त्याला पन्नास हजारांचा दंड आकारण्यात आला. सीमा शुल्क विभागाचे अधिकाऱ्याने थांबविल्याने रणबीर संतप्त झाला होता. एककीकडे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली असतांना अधिकारी त्याची चौकशी करत होते. सुमारे ४० मिनिटे त्याची चौकशी सुरू होती. त्यामुळे तो अधिकच चिडला होता.
गेल्या तीस वर्षांत मला कुणी अडवले नाही, असे उर्मटपणे त्यांने सांगितल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाचे पोलीस उपायुक्त समीर वानखेडे यांनी दिली. अजाणतेपणे एखादी व्यक्ती महागडे सामान आणते. पण आपल्याला कुणी अडवणार नाही या गुर्मीत रणबीर होता. हे बेकायदेशीर आहे आणि कुणी किती मोठा असला तरी कारवाई ही होते अशा शब्दात त्याला समज दिल्याचे वानखेडे यांनी सांगितले. सीमा शुल्क विभागाच्या या कारवाईने रणबीरची गुर्मी उतरली होती. यापुर्वी बिपाशा बासू, मल्लिका शेरावत, मिनिषा लांबा आदंी सेलिब्रेटींनाही याच पद्धतीने नियमांचे उल्लघंन करुन महागडय़ा वस्तू आणल्याने सीमा शुल्क विभागाने दंड आकारला होता.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2013 रोजी प्रकाशित
उर्मट रणबीर कपूरला ५० हजारांचा दंड
लंडनहून महागडी घडय़ाळे, परफ्युम्स आदी सामान घेऊन मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या अभिनेता रणबीर कपूरला सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेऊन पन्नास हजारांचा दंड आकारला. या महागडय़ा सामानाचा तपशिल त्याने जाहीर केलेला नव्हता. या कारवाईने संतप्त झालेल्या रणबीरने ‘गेल्या तीस वर्षांत मला कुणी अडवले नाही’ अशा उर्मटपणे आपला राग व्यक्त केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-05-2013 at 03:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor detained fined for customs violation