‘लोकसत्ता’चा ‘ब्लॉग बेंचर्स’ हा उपक्रम स्तुत्य आणि काळानुरूप आहे. आज आमचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धेला तोंड देत आहेत. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. अशा वातावरणात त्यांच्या सोयीचे, सवयीचे माध्यम पुरविले जाणे गरजेचे आहे. जे ‘लोकसत्ता’ने केले आहे. या उपक्रमात आमच्या महाविद्यालयातील व्यवस्थापनशास्त्राचे (एमबीए) शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होतील. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाविद्यालयाकडून करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, वैचारिक बैठक यावर विचार व चर्चा होऊन भावी व्यवस्थापक तयार करण्याच्या आमच्या प्रयत्नांना जोड मिळाली तर शिक्षक वर्ग व संस्थांना नक्कीच उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करता येईल. तसेच विद्यार्थ्यांनाही आजच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आत्मविश्वास मिळेल. त्यामुळेच हा उपक्रम भावी व्यवस्थापक तयार करण्यास मोलाची मदत करणारा ठरेल, असा विश्वास वाटतो. – डॉ.सरिता औरंगाबादकर, संचालिका (जेडीसी बिटको इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज अॅन्ड रिसर्च, नाशिक)
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी..
* स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
* ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
* यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
* ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’
