जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीविरोधातील आरोपपत्रातील महत्त्वाची माहिती प्रसिद्धीमाध्यमांकडे उघड केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने सीबीआयची शुक्रवारी कानउघाडणी केली. हा प्रकार खूप गंभीर आहे, असे सुनावत भविष्यात त्याची पुनरावृत्ती न करण्याचेही न्यायालयाने सीबीआयला बजावले आहे. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने सूरजविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2015 रोजी प्रकाशित
तपशील उघड केल्याप्रकरणी सीबीआयची कानउघाडणी
विशेष न्यायालयाने सीबीआयची शुक्रवारी कानउघाडणी केली
Written by रत्नाकर पवार

First published on: 13-12-2015 at 06:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special court slam cbi