पन्नास हजारांची लाच घेतल्याचा आरोप असलेला पनवेलचा नायब तहसीलदार आणि शरीरसोष्ठवपटू सुहास खामकर याला मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खामकर आणि त्याचा साथीदार गणेश भोगाडे या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
पनवेल तालुक्यातील कोयनावेळें या गावातील जमीन विक्री प्रकरणाची सात बारावर नोंद करण्यासाठी खामकरने एक लाख रुपयांची मागणी केली होती. याशिवाय काही कागदपत्राची पुर्तता करून प्रस्ताव देण्याची सुचना तक्रारदाराकडे करण्यात आली होती. ३० जुलैला दिलेल्या प्रस्तावाची नोंद झाली का हे पाहण्यासाठी तक्रारदार तहसिल कार्यालयात गेले असता. खामकर यांनी त्यांना आपले सहाय्यक गणेश भोगाडे यांना भेटण्याची सुचना केली. गणेश भोगाडे यांनी तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे तक्रारदारांनी मान्य केले होते. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर रायगडच्या लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.
सोमवारी दुपारी खामकर यानी आपले खासगी सहाय्यक गणेश भोगाडे यांच्या हस्ते लाचेची ५० हजार रुपयांची रक्कम स्विकारली. दरम्यान लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,८, १३(१)ड आणि कलम १३(२) मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. रायगड लाचलुचपत विभागाचे उप अधिक्षक सुनील कलगुटकर आणि महीला पोलीस निरीक्षक इनामदार यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2014 रोजी प्रकाशित
सुहास खामकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी
पन्नास हजारांची लाच घेतल्याचा आरोप असलेला पनवेलचा नायब तहसीलदार आणि शरीरसोष्ठवपटू सुहास खामकर याला मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-08-2014 at 04:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhas khamkar remanded to police custody