पश्चिम उपनगरात रेल्वे टर्मिनस उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले. विलेपाल्रे स्थानकात पादचारी पुलाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. पश्चिम रेल्ववरील खार स्थानकातील पादचारी पुलाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले. मुंबईसाठी ४० हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प रेल्वे राबवणार आहे. यात उन्नत रेल्वे मार्गासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खार ते विलेपाल्रेदरम्यान रेल्वेने प्रवास केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-04-2016 at 00:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh prabhu railway terminus in western suburbs