विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची खंत
मुंबई : संधी मिळविण्यासाठी किंवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लोकप्रतिनिधीला आक्रमकता दाखवावी लागते, हे वाईट असते. त्यामुळे गुणवत्ता असलेले अनेकजण राजकारणाच्या स्पर्धेत डावलले जातात, अशी खंत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात व्यक्त केली. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्दय़ांवर वादग्रस्त आणि लक्षणीय ठरल्याच्या पाश्र्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या ‘आयडिया एक्स्चेंज’मध्ये वळसे-पाटील यांनी हक्कभंग, विशेषाधिकार, सभागृहातील कामकाजाचा दर्जा, लोकप्रतिनिधींचे वर्तन आदी अनेक वैधानिक विषयांवर मुक्त चिंतन केले.