मुसळधार पावसामुळे कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. कारण या मार्गावर पडलेल्या पावसामुळे लोकलसेवेची दाणादाण उडवली होती. ही सेवा पूर्ववत होण्यास मंगळवार उजाडेल हे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे दोन दिवसांनी ही सेवा पूर्ववत झाली आहे.

पहाटे ४. वाजून ४८ मिनिटांनी CSMT ते कर्जत ही ट्रेन सुटली. तर ५ वाजून ५३ मिनिटांनी कर्जहून सीएसएमटीला जाणारी ट्रेन सुटली. ठाण्याहून कर्जतला जाणारी ट्रेन पहाटे पाच वाजता सुटली. त्यामुळे आता हा मार्ग पूर्ववत झाला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर पाणी साठले होते.

अनेक ठिकाणी रुळांवरची माती, खडी वाहून गेली होती. हा सगळा मार्ग पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले होते. दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर या मार्गावरुन लोकल धावली आहे. आता ही सेवा पूर्ववत झाली आहे.मध्य रेल्वेने ट्विट करत ही माहिती दिली आहे. कर्जत बदलापूर मार्ग आता पूर्वपदावर आला आहे.

सोमवारी अनेकांनी ऑफिसला येणं टाळलं होतं. आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे त्यामुळे आज ट्रेन्सना गर्दी असणार हे निश्चित आहे.