दिघा येथील ईश्वरनगर मध्ये खासगी शिकवणीवर्ग चालवणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने त्याच्याकडे शिकण्यास येणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडीस आली आहे. तक्रार देऊनही पोलिस दोन दिवस काहीही कारवाई करित नसल्याने संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी पोलीस चौकीवर मोर्चा नेल्यानंतर पोलिसांना या तरुणाला अटक केली. प्रशांत त्रिपाठी असे या बलात्कार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
त्रिपाठी ईश्वरनगर मध्ये घरगुती शिकवणी घेतो. सातवीत शिकणाऱ्या मुलीचे गणित कच्चे असल्याने तिच्या आईवडिलांनी त्रिपाठीच्या वर्गामध्ये तिला दाखल केले होते. दोन वर्षे ही मुलगी या वर्गाला जात होती. तीन दिवसांपूर्वी त्रिपाठीने तिला चार तास आधी बोलवून तिच्यावर बलात्कार केला. घरी सांगू नये म्हणून या मुलीला धमकी देण्यात आली होती. शारीरिक त्रास वाढल्याने या मुलीने आपल्या आईला ही बाब सांगितली. त्यानंतर आईवडिलांनी जवळच्या मुकुंदनगर चौकीवर तक्रार दाखल केली पण दोन दिवस झाले तरी पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी व आजूबाजूच्या रहिवाशांनी चौकीवर माोर्चा नेला. तेव्हा रात्री उशिरा पोलिसांनी या तरुणाला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2013 रोजी प्रकाशित
अल्पवयीन मुलीवर शिकवणीवर्ग चालकाचा बलात्कार
दिघा येथील ईश्वरनगर मध्ये खासगी शिकवणीवर्ग चालवणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने त्याच्याकडे शिकण्यास येणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडीस आली आहे.
First published on: 16-02-2013 at 04:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tution teacher raped on minor girl