नालासोपार्‍या आज भर रस्त्यात एका दुचाकी आणि रिक्षाने पेट घेतला. या घटनेत पाच जण होरपळून जखमी झाले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

एक दुचाकीस्वार नालासोपारा पश्चिमेच्या सिविक सेंटर समोर टँकरमधील पाण्याने आपली दुचाकी धूत होता. त्यावेळी अचानक दुचाकीने पेट घेतला. त्यावेळी दुचाकीच्या मागे असलेली रिक्षादेखील आगीच्या ज्वाळात सापडली. या आगीत रिक्षा आणि दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली.

रिक्षाचालकासह तीन प्रवासी तसेच दुचाकीचामालक या आगीत जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकी आग कशामुळे लागली त्याचा तपास सुरु असल्याची, माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली आहे.