नाटक, चित्रपट, मालिका या तीनही माध्यमांत दिग्दर्शन आणि अभिनय यांवर प्रभुत्व असलेले ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्यावर रविवारी दुपारी ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मराठी नाटय़-मालिका-चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी रंगभूमी, मालिका, मराठी तसेच हिंदूी चित्रपट या सर्वच माध्यमांत आपल्या धीरगंभीर आवाजाच्या आणि जबरदस्त अभिनयशैलीच्या जोरावर वेगळा ठसा उमटवणाऱ्या विनय आपटे यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी दुपारी शास्त्रीनगर येथील त्यांच्या घरी सचिन खेडेकर, सुनील बर्वे, संजय जाधव, स्वप्निल जोशी, हर्षदा खानविलकर, सतीश पुळेकर, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस, रिमा, मुग्धा गोडबोले, मधुरा वेलणकर, ऋतुजा देशमुख, लोकेश गुप्ते, नाटय़निर्माती लता नार्वेकर, नाटय़निर्माता प्रसाद कांबळी या सर्वानी आपटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinay apte funeral takes place at mumbai