केंद्रीय अखत्यारीतील कार्यालये महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित करण्यामागे राज्याला कमजोर करण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त करणारे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पाठविले . संसदेत खा. किरीट सोळंकी यांनी मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरात येथे नेण्यासाठी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्याकडून हे पत्र पाठविण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातमध्ये जाऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी राऊत यांनी आपल्या पत्रात केली आहे. 
याआधीच मुंबईतील रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग दिल्लीकडे नेण्यात आले आहेत. तर जेएनपीटी बंदरातील महत्वाची वाहतूक गुजरातकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित करण्यात येणाऱ्या संस्थांच्या कार्यालयांबद्दल राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातला नेण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway headquarter in mumbai will be not shifted in gujarat