मालमत्ता करात १० टक्के सवलत; नागरिकांना ३० जूनपर्यंत संधी 

चालू आर्थिक वर्षांसाठीचा संपूर्ण मालमत्ता कर आगाऊ स्वरूपात ३० जून २०२२ पर्यंत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकास (शासनाचे कर वगळून) १० टक्के सवलत दिली जाणार आहे.

property tax
संग्रहित छायाचित्र

नागपूर : चालू आर्थिक वर्षांसाठीचा संपूर्ण मालमत्ता कर आगाऊ स्वरूपात ३० जून २०२२ पर्यंत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकास (शासनाचे कर वगळून) १० टक्के सवलत दिली जाणार आहे.

१ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत चालू आर्थिक वर्षांसाठी असलेले संपूर्ण मालमत्ता कर आगाऊ स्वरूपात महापालिका निधीत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकास शासनाचे कर वगळून  ५ टक्के सवलत दिली जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी महापालिकेच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे कर विभागाच्यावतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मालमत्ता करधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 10 per cent relief property tax opportunity citizens till june 30 ysh

Next Story
‘एमपीएससी’च्या बदलांचा विद्यार्थ्यांना फटका; नव्या सुधारणा दोन ते तीन वर्षांनंतर लागू करण्याची मागणी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी