बुलढाणा : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरू लागला असतानाच ‘स्क्रब टायफस’ या नवीन आजाराने डोके वर काढले आहे. बुलढाणा जिल्ह्यात या आजाराचे तब्बल ९ रुग्ण आढळले असून एकट्या खामगाव तालुक्यातील ७ रुग्णांचा यात समावेश आहे. यातील एका गंभीर रुग्णावर अकोला येथे उपचार सुरू आहे. सदर रुग्ण जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाचा समर्थपणे सामना करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोर आता ‘स्क्रब टायफस’ला नियंत्रित करण्याचे आव्हान आहे. या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर जवळपास ८ ते १० दिवसांनी ताप येणे,  अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी,  अशी लक्षणे जाणवतात. अनेकदा रुग्ण मेंदूत ताप गेल्याने बेशुद्ध होतात आणि यातच मृत्यूही ओढवतो. या आजाराचे निदान व उपचार शक्यतो शासकीय रुग्णालयात करणे आवश्यक असून यामुळे आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाणार आहे.

हेही वाचा >>> नागपूर : सरणावर पाणी, लाकडेही ओली, चिता जळेचना!, शहरातील स्मशानघाटांची दुरावस्था

काय आहे ‘स्क्रब टायफस’?

उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील ‘संक्रमित चिगर्स’ (लार्वा माइट्स) हा एक प्रकारचा कीटक चावल्यावर यातील ‘ओरिएंशिया सुसूगामुशी’ नावाचा जिवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो. यातूनच या आजाराची लागण होते. प्राप्त माहितीनुसार,  या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात. भारतात वर्षभरातून एक किंवा दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळतात. या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण 30 टक्के असल्याने हा आजार अतिशय घातक असल्याचे म्हटल्या जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 people affected in buldhana with the new disease scrub typhus zws