बुलढाणा : जळगाव तालुक्यातील रहिवासी व भारतीय वायुसेनेचे संवाद तंत्रज्ञ दिवंगत मिथिल दिलीप देशमुख यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जनसागर उसळला होता. बंगळूरू येथून त्यांचे पार्थिव बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली. जळगाव येथील वाडी खुर्द स्थित स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी भारतीय वायुसेनेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. माजी सैनिक दिलीप जाधव व मुख्याध्यापिका रेखा देशमुख यांचे ते कनिष्ठ चिरंजीव होते. भारतीय वायुसेनेच्या वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रातील संवाद तंत्रज्ञ (कम्युनिकेशन टेक्निशियन) या पदावर ते कार्यरत होते. १६ ऑक्टोबरला सकाळी ५ वाजता कर्तव्य बजावत असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिथिल यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air force mithil deshmukh body was cremated with state honors scm 61 ysh