राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०९ वा दीक्षांत सोहळा बुधवार २५ मे रोजी आयोजित करण्यात आला असून राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत प्रामुख्याने उपस्थित राहतील. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक पदक व पारितोषिके मिळवणात पहिल्या चारही क्रमांकावर विद्यार्थिनी आहेत हे विशेष. यामध्ये बी.ए. एलएलबीच्या अपराजित अरुणकुमार गुप्ता हिला ८ सुवर्ण पदके आणि दोन पारितोषिके, एम.एसस्सीच्या निधी शाहू हिला ४ सुवर्ण व एक रौप्य पदक, एम.ए.मराठीच्या शुभांगी देविदास धरगावे हिला चार सुवर्ण पदके व एक पारितोषिक तर एम.ए. डॉ. आंबेडकर विचारधाराच्रूा श्रीया नंदगवळी हिला ४ गुणव आणि एक पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. करोनामुळे परीक्षेची गुणवत्ता घसरल्याने यंदा पदवी, पदव्युत्तरच्या पदव्यामध्ये मोठी वाढ झाली असून ७७ हजार ६७८ विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटप केले जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2022 रोजी प्रकाशित
नागपूर विद्यापीठाचा १०९ वा दीक्षांत सोहळा उद्या ; सुवर्ण पदकांमध्ये विद्यार्थिनींची बाजी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०९ वा दीक्षांत सोहळा बुधवार २५ मे रोजी आयोजित करण्यात आला असून राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-05-2022 at 17:22 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Convocation ceremony nagpur university tomorrow the students bets on gold medals amy