वाशीम : संघटन व पक्षविरोधी कारवाया आणि संघटनेच्या ध्येयधोरणा विरुध्द कार्य करणे यासह इतर अनेक तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेवून स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष अर्जुन खरात यांची संभाजी ब्रिगेड मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या ३० वर्षापासून मराठा सेवा संघाचा एक कक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात प्रचंड आक्रमकपणे कार्य करत आलेली आहे. नंतरच्या काळात २०१६ ला संभाजी ब्रिगेडने अधिकृत राजकीय भूमिका घेवून पक्षाची ध्येय धोरणे व संहिता ठरलेली आहेत.
९ फेब्रुवारी २०२३ च्या एका संयुक्त बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून समज देण्यात आली व त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. परंतु माजी जिल्हाध्यक्ष अर्जुन खरात यांच्याविरुध्द सतत पक्षविरोधी कार्य करणे, संघटन वाढीसाठी कुठलेच कार्य न करता इतर पक्षासोबत राहून हुजरेगिरी करणे, संघटनेचे/पक्षाचे ध्येय धोरण व संहिता विरोधी कार्य करणे. आदी कारणांमुळे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पदावरून खरात यांची हकालपट्टी करण्यात आली असून जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यक्तींपासून सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे यांनी केले आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी सभाजी ब्रिगेडच्या विचारांशी गद्दारी करणार्यांना योग्य धडा शिकवू. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हा इतिहास आहे. -गजानन भोयर संभाजी ब्रिगेड,विभागीय अध्यक्ष