गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

जिल्हा मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील पोटला येथे वाघाच्या हल्ल्यात ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

tiger
( संग्रहित छायचित्र )

जिल्हा मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील पोटला येथे वाघाच्या हल्ल्यात ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. किशोर तुळशीदास मामीडवार (रा. पोटला, जि. गडचिरोली), असे मृतकाचे नाव आहे.किशोर सकाळी पोटला येथून ६ किलोमीटर अंतरावर वनविभागाच्या राखीव जंगल परिसरात जळाऊ लाकडे आणण्यासाठी गेला असता दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला.

यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.आरमोरी तालुक्यातील इंजेवारी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षी वाघानेच या युवकाचा बळी घेतला असल्याची शक्यता वर्तविली जात असून नागरिकांनी परिसरातील जंगलात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाद्वारे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gadchiroli youth killed tiger attack forest department squadn amy

Next Story
नागपूरलगतच्या गावांना जोडणारा महामार्ग सहा पदरी होणार; नितीन गडकरींनी घेतला कामाचा आढावा
फोटो गॅलरी