पर्यावरण पुनस्र्थापना करणारा भारतातील पहिलाच प्रकल्प

नागपूर : पॅरिस कराराअंतर्गत  कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी सरसावणारा पेंच व्याघ्रप्रकल्प हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे. याकरिता पर्यावरण पुनस्र्थापना आणि वातावरण या प्रकल्पाअंतर्गत सुमारे २७२ हेक्टरवर हरितक्षेत्र विकसित करून ११ हजार टन कार्बन साठवण्याचे पेंच व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे.

भारताने पॅरिस कराराअंतर्गत २०३० पर्यंत ३० मिलियन मेट्रिक टन कार्बन कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. उद्योगांमुळे वाढणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असतानाच पेंच व्याघ्रप्रकल्पाने हरितक्षेत्र वाढवून त्यास हातभार लावला आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पातील तोतलाडोह येथील गावे आणि जुन्या इमारती असलेली जागा सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये या व्याघ्रप्रकल्पाला हस्तांतरित के ली. या इमारती जमीनदोस्त करून पेंच प्रशासनाने माती आणि जमिनीतील ओलावा संवर्धनाचे काम हाती घेतले. दरम्यान, केंद्राने कराराच्या पूर्तीसाठी ‘नॅशनल अ‍ॅडॉप्शन फंड फॉर क्लायमॅट चेंज’ हा कार्यक्र म आणला. त्याअंतर्गत पेंच प्रशासनाने या संपूर्ण जागेवर वृक्षलागवड, गवती कु रणे विकास व मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड अशा तीन पद्धतीने हरितक्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू के ले.

२०१९-२० मध्ये हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली. हा संपूर्ण प्रकल्प २१.६३ कोटी रुपयांचा असून आतापर्यंत एक तृतीयांश रक्कम नाबार्डकडून पेंच व्यवस्थापनाला मिळाली आहे. मागील दोन वर्षांत या तिन्ही पद्धतीने ४० ते ५० हेक्टरवर काम सुरू झाले आहे. मियावाकीच्या धर्तीवर राज्य सरकारने आणलेल्या अटल घन वन योजनेअंतर्गत आतापर्यंत दीड हेक्टर जमिनीवर मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड केली आहे. कमी जागेत अधिकाधिक वृक्षलागवड करून अधिकाधिक कार्बनसाठा जमा करण्याचा प्रयत्न आहे. तर काही ठिकाणी गवती कु रणे विकसित करण्यात आली असून स्थानिक प्रजातीची वृक्षलागवड करण्यात येत आहे. अवघ्या दोन वर्षांतच त्याचा चांगला परिणाम देखील दिसून आला आहे.

प्रकल्पात नक्की काय..

’  प्रकल्पाचा एकू ण कालावधी पाच वर्षे

’  प्रकल्पाकरिता एकू ण जमीन २७२ हेक्टर

’  प्रकल्पाचा एकू ण खर्च २१.६३ कोटी रुपये

’  दीड हेक्टरवर मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड

’  नाबार्डकडून आतापर्यंत एक तृतीयांश रक्कम

’  ११ हजार टन कार्बन साठवण्याचे उद्दीष्ट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तोतलाडोह येथील सिंचन वसाहतीची जागा आम्हाला परत मिळाली. वसाहत पाडून रिकाम्या झालेल्या जागेवर हरितक्षेत्र उभारून कार्बन साठा वाढण्यासाठी तीन पद्धतीचा अवलंब के ला. जितके  जास्त हरितक्षेत्र तितका कार्बनसाठा अधिक. या हरितक्षेत्रामुळे वन्यजीवांसाठी अधिवासही तयार होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील गावांची आणि गावकऱ्यांची जीवनशैली सुधारायची आहे. वृक्षलागवडीच्या माध्यमातून कार्बनसाठा वाढवून वातावरण बदलाचा परिणाम कसा कमी करता येईल, याकरिता विद्यार्थी, लोक आणि पर्यटकांमध्ये जनजागृतीसाठी वेगळा उपक्र मदेखील हाती घेतला आहे.

– डॉ. रवीकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक,   पेंच व्याघ्रप्रकल्प.