२४ तासांत ४ रुग्णांची भर
नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ४ नवीन करोनाग्रस्तांची भर पडली. सलग दोन दिवस करोनामुक्तांहून नवीन रुग्ण अधिक आढळल्याने सक्रिय रुग्णसंख्या ३१ रुग्णांवर पोहोचली.
सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील २६, ग्रामीणचे ५ अशा एकूण ३१ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात शहरात ३, ग्रामीणला १ असे एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार ४०३, ग्रामीण १ लाख ४६ हजार २०२, जिल्ह्य़ाबाहेरील ६,८९० अशी एकूण ४ लाख ९३ हजार ४९५ रुग्ण नोंदवली गेली. दरम्यान, बुधवारी जिल्ह्य़ात ११ रुग्ण आढळले असतांनाच दुसऱ्या दिवशी केवळ ४ रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्य़ात दिवसभरात एकही मृत्यू नसल्याने शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५,८९३, ग्रामीण २,६०४, जिल्ह्य़ाबाहेरील १,६२४ अशी एकूण १०,१२१ रुग्ण इतकी आहे. शहरात दिवसभऱ्यात ३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ४८४, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५९३, जिल्ह्य़ाबाहेरील ५,२६७ अशी एकूण ४ लाख ८३ हजार ३४४ इतकी आहे.
३,१२६ चाचण्या शहरात दिवसभरात २,४५७, ग्रामीणला ६६९ अशा एकूण ३,१२६ चाचण्या झाल्या. ही संख्या बुधवारी जिल्ह्य़ात थोडी जास्त म्हणजे ३,४९२ इतकी होती.