२४ तासांत ११ नवीन रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत एकही करोनाग्रस्ताचा मृत्यू नाही, परंतु ११ नवीन रुग्णांची भर पडली. बुधवारी जिल्ह्यात ८ रुग्ण आढळले असून पुन्हा दोन अंकी रुग्ण आढळले, हे विशेष. जिल्ह्यात ६ आणि ७ डिसेंबरला सलग दोन दिवस दोन अंकी रुग्ण तर ८ डिसेंबरला एक अंकी रुग्ण आढळले होते. परंतु गुरुवारी दिवसभरात शहरात ९, ग्रामीणला २ असे एकूण ११ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख ४० हजार ५५३, ग्रामीण १ लाख ४६ हजार २३९, जिल्ह्याबाहेरील ६,९११ अशी एकूण ४ लाख ९३ हजार ७०३ रुग्णांवर पोहचली आहे. तर दिवसभरात शहरात १, ग्रामीणला २, जिल्ह्याबाहेरील ५ असे एकूण ८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ५९०, ग्रामीण १ लाख ४३ हजार ६१९, जिल्ह्याबाहेरील ५ हजार २८६ अशी एकूण ४ लाख ८३ हजार ४९५ व्यक्तींवर पोहचली आहे. दरम्यान गुरुवारी शहरात ७०, ग्रामीणला १६ असे एकूण ८६ सक्रिय करोनाग्रस्त रुग्ण नोंदवले गेले. तर जिल्ह्यात एकही रुग्णाचा मृत्यू नसल्याने शहरात आजपर्यंत ५,८९३, ग्रामीण २,६०४, जिल्ह्याबाहेरील १,६२५ असे एकूण १०,१२२ इतके मृत्यू झाले.

सलग दुसऱ्या दिवशी चार हजारावर चाचण्या  

शहरात करोनाग्रस्त वाढल्याने चाचण्यांची संख्याही वाढली. गुरुवारी शहरात ३,००९, ग्रामीणला १,२६९ अशा एकूण ४,२७८ संशयितांच्या चाचण्या झाल्या. ही चाचणी बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ४,३१२ संशयित एवढी होती.