वाशीम : सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला विरोध केला जात असून जिल्हा परिषद शाळेत बेरोजगार डीएड, बीएड युवकांना नियुक्त करावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेने शिक्षक मंत्री यांच्याकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक युवकांनी मोठ्या आशेने डीएड बीएड केले आहे. परंतु शिक्षक पद भरतीच होत नसल्याने अनेकांवर उपासमारी ची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा निर्णय राज्यातील डीएड बीएड युवकांवर अन्यायकारक असून जिल्हा परिषद शाळेत सुशिक्षित बेरोजगार डीएड बीएड युवकांना संधी द्यावी, अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे राजकुमार पडघान यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Provide opportunities to unemployed d ed b ed youth in zilla parishad schools pbk 85 ysh