‘हँड ग्लायडर’ ने लक्ष वेधले
नागपूरकरांनी दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा सारंग हेलिकॉप्टरच्या चमूतर्फे चित्तथरारक कवायती अनुभवल्या. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘एअरो शो’च्या स्थानाविषयी वाद निर्माण करण्याच्या प्रयत्नाला न्यायालयानंतर यशस्वी आयोजनाने चपराक दिली.
फली बक्षी यांच्या ‘एअरो मॉडेल शो’ने सुरुवात झाली आणि बच्चे कंपनीने एकच जल्लोष केला. टाळ्यांचा कडकडाट आणि वॉव..वॉव अशी सादरीकरणाला साद मिळत होती. पण प्रेक्षकांचे मन जिंकले ते सारंगच्या वेगवेगळ्या ‘फारमेशनने.’ प्रेक्षकांच्या मागच्या बाजूने सारंगची चार विमाने आली. मागे आवाज येत असल्याचे लक्षात येतात प्रेक्षकांच्या नजरा मागे वळल्या आणि पुन्हा टाळ्यांचा गजर झाला. सारगंच्या चमूचे नेतृत्व विंग कमांडर अभ्यंकर करीत होते.
या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘हँड ग्लायडर’ कवायती. ‘आकाशातून’ घिरटय़ा घालणाऱ्या ‘पॉवर हँड ग्लायडर’मधील वैमानिक प्रक्षेकांना हात दाखवत होते. मुले देखील ते बघून तिकडे हात दाखवू लागले. एव्रोच्या दोन विमानांची जोडी प्रक्षेकांच्या उजव्या बाजूने आली. खूप दूर असलेल्या या विमानांचे केवळ लाईट्स दिसत होते. त्या दिशेने सगळ्यांच्या नजरा वळल्या काही सेकंदात ही दोन्ही विमान समान अंतर राखत अनुरक्षण कमानच्या मैदानावरून भरकन निघाले.
एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमधून सहा शस्त्रधारी गरुडच्या जवानांना दोरीद्वारे मैदानात उतरविण्यात आले. प्रत्येक एक जवान दोरीच्या सहाय्याने विशिष्ट अंतर राखून खाली उरताना बघून प्रक्षेकांच्या अंगावर शहारे उमटले होते. या सर्व सहा जवानांना उतरविल्याने नंतर विंग कमांडर विशाल काळे हेलिकॉप्टर घेऊन गेले. उतरलेल्या बंदूकधारी जवानांनी मैदानावर संचलन केले. हे हेलिकॉप्टर नैसर्गिक संकटात नागरिकांना मदत करीत असते.
मुलांच्या आनंदात भर टाकणारी एक गोष्ट म्हणजे आकाशगंगा चमूचे सादरीकरण ठरले. आग्रा येथील ‘पॅराट्रप्स ट्रेनिंग स्कूल’च्या जवानांच्या ‘आकाशगंगा’ चमूने आकाश गंगा स्कायडाव्हिंगचे सादरीकरण केले. या चमूचे नेतृत्त्व विंग कमांडर विशाल राकेश हे होते. त्यानंतर गरुडच्या कमांडोचे सादरीकरण झाले.
कार्यक्रमाची सांगता ‘स्टॅटिक डिस्प्ले’ ने झाली. यात प्रामुख्याने एमआय१७ व्ही ५ बघण्यासाठी ठेवण्यात आले होते. कार्यक्रमात ‘एअर फोर्स बँड’ची धून अधून-मधून सुरू होती. तसेच धावते समालोचन करण्यात येत असल्याने वातावरण निर्मिती केली जात होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागरिकांची गैरसोय
नागरिकांची व्यवस्था गैरसोयीच्या ठिकाणी करण्यात आल्याने कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिस्त पाळणारे नागरिक प्रसारमाध्यमांच्या कक्षामध्ये घुसले. त्यामुळे वृत्तांकन करणे कठीण झाले होते. शिवाय अनेक पत्रकार कुटुंबासोबत आले होते. त्यांना त्याचा फटका बसला. गणेश विसर्जन असल्याने फुटाळा तलावाच्या सभोवताल गर्दी होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. वायुसेनानगराचे प्रवेशद्वार ते फुटाळा तलाव परिसरात प्रचंड गर्दी होती.

‘एअर फेस्ट’
भारतीय हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्त वायुसेनानगरात ‘एअर फेस्ट’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यदां हवाई दलाचा ८३ वा वर्धापन दिन ८ ऑक्टोबरला साजरा होत आहे. नागपुरातील अनुरक्षण कमानच्या मुख्यालयातर्फेयंदा हवाई दल दिनाचा कार्यक्रम वायुसेनानगरात घेण्यात आला. अनुरक्षण कमांडचे प्रमुख एअर मार्शल जगजित सिंग यांच्यामुळे हा कार्यक्रम कमान परिसरात घेण्यात आला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarang helicopter take part in air show in nagpur