लगडगंज परिसरातील नागरिकांमध्ये आरोपी वसीम चिऱ्या व त्याच्या आठ साथीदारांची प्रचंड दहशत आहे. या आरोपींवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. वसीम चिऱ्या व त्याच्या टोळीतील सदस्यांवरील दाखल गुन्हे बघता या आठही आरोपींवर पोलिसांनी ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल बाजीद उर्फ पटेल अब्दुल नवाब, सैय्यद शोहराब उर्फ भैय्या सैय्यद अहफाज, शेख वसीम उर्फ छोटा वसीम वल्द शेख हबीब, सैयद अय्याज अली फैय्याज आली, शेख मुदस्तीर उर्फ गोलू शेख गुलाम, शेख वसीम उर्फ चिऱ्या शेख अफजल, शेख निसार शेख हाफिज व एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत. नमूद आरोपींवर सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्या टोळीतील नवाब अनवर मोहम्मद हबीबउर रहमान याची वर्चस्वाकरिता हत्या केल्याचा आरोप आहे. मृत नवाबचा मृतदेह आरोपींनी पोत्यात भरून कामठीच्या नहरात फेकला होता. या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी नमूद आरोपींपैकी सहा आरोपींना अटक केली होती.
यातील टोळीचा म्होरक्या चिऱ्या उर्फ शेख निसार शेख हाफिज हे दोघे अद्याप पोलिसांच्या तावडीतून फरार आहे. या टोळीने गेल्या दहा वर्षांत लकडगंज परिसरात नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दहशत निर्माण केली आहे. पैकी अनेक गंभीर गुन्हात पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. हे आरोपी अनेक गुन्ह्य़ांत तीन वर्षांहून जास्त शिक्षेस पात्र आहेत. हे गुन्हे टोळीच्या फायद्याकरिता झाल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीची नागरिकांमधील दहशत कमी व्हावी या दृष्टीकोणातून या आठही आरोपींवर पोलिसांनी ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2015 रोजी प्रकाशित
वसीम चिऱ्यासह आठ आरोपींविरुद्ध ‘मोक्का’
लगडगंज परिसरातील नागरिकांमध्ये आरोपी वसीम चिऱ्या व त्याच्या आठ साथीदारांची प्रचंड दहशत आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-11-2015 at 00:02 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim cirya with eight accused booked under mcoca