बुलढाणा : मेंढपाळांचा वनमजुरांवर हल्ला; महिला वनाधिकाऱ्याने हवेत गोळीबार करून वाचवले प्राण

जिल्ह्यातील मोताळा वन परिक्षेत्रातील खैरखेड बिटमध्ये मेंढपाळांनी वनमजुरांवर हल्ला केला.

बुलढाणा : मेंढपाळांचा वनमजुरांवर हल्ला; महिला वनाधिकाऱ्याने हवेत गोळीबार करून वाचवले प्राण
जखमी वनमजुरांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुलढाणा : जिल्ह्यातील मोताळा वन परिक्षेत्रातील खैरखेड बिटमध्ये मेंढपाळांनी वनमजुरांवर हल्ला केला. यात दोन मजूर गंभीर जखमी झाले. वनमजुरांना मेंढपाळांच्या तावडीतून सोडवण्यासाठी महिला वनाधिकाऱ्याने हवेत गोळीबार केला. यामुळे सुदैवाने वनमजुरांचा जीव वाचला. जखमी वनमजुरांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खैरखेड वन बिट ३२७ मध्ये वन विभागाच्या वतीने २ वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. याठिकाणी मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी सोडतात.

मंगळवारी काही मेंढपाळांनी तेथे आपल्या मेंढ्या सोडल्या. यामुळे त्यांना हटकले असता मेंढपाळांनी खैरखेड येथील वनमजूर भारत राठोड (२५) व तरोडा येथील वनमजुर नारायण शेळके (४६) या दोघांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे आपल्या कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचल्या. मेंढपाळांच्या गराड्यात दोन्ही वनमजूर जखमी पडलेले होते. त्यांचा जीव वाचवण्यासाठी व त्यांना मेंढपाळाच्या तावडीतून सोडवण्यासाठी मुरकुटे यांनी आपल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. यामुळे मेंढपाळ जंगलात पसार झाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चंद्रपूर : महिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
फोटो गॅलरी